गुणरत्न सदावर्तेच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेवर वर्चस्व

 गुणरत्न सदावर्तेच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेवर वर्चस्व


मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डॉ .गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बँकेतील संचालकपदाच्या १९ जागांपैकी १९ ही जागा जिंकून कामगार आघाडीला धक्का दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ पॅनल स्थापन केले.
या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत १९ उमेदवार निवडणूक रिगणात उतरवलं. राज्यातील सर्व एसटी स्थानकातील सुशिक्षित उमेदवारांना संधी देऊन शरद पवार यांच्या एसटी कामगार संघटनेच्या विरोधात दंड थोपटले.
आज ( सोमवारी) स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून कामगार संघटनेच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.Gunaratna Sadavarte’s ST Toilers Jan Sangh panel dominated the State Transport Co-operative Bank

एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची २३ जून रोजी राज्यभरातील २८१ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडली. मुंबईतील कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे या निवडणुकीची मतमोजणी पार पडली.विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना दूर करत नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी प्रचंड मुसंडी मारली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जादा मतदान घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनल मात्र, पिछाडीवर गेले असून, ७ व्या क्रमांकावर दिसून आले आहे.
या विजयानंतर सदावर्ते यांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

ML/KA/PGB
26 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *