अंदमान निकोबारमध्ये उभारलेल्या राष्ट्रध्वजाला रामदास आठवलेची मानवंदना

 अंदमान निकोबारमध्ये उभारलेल्या राष्ट्रध्वजाला रामदास आठवलेची मानवंदना


पोर्टब्लेयर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये अंदमान निकोबार मध्ये भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज उभारला. त्या ऐतिहासीक स्थळी भेट देवून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय राष्ट्रध्वजाला सॅलुट देवुन मानवंदना दिली.
रामदास आठवले हे अंदमान निकोबारच्या दौ-यावर असुन येथील विविध बेटांना आणि ऐतिहासीक स्थळांना भेटी दिल्या. पोर्टब्लेयर येथे सचिवालयात अंदमान निकोबार या केंद्रशासीत प्रदेशातील समाजकल्याण, पोलीस, जिल्हाधिकारी, विविध अधिका-यांची बैठक घेवुन शासकीय योजनांचा आढावा घेतला.Ramdas Athawale pays homage to the national flag hoisted in Andaman and Nicobar

अंदमान निकोबारवर जपानचे राज्य होते. महान स्वांतत्रसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापना केल्यानंतर अंदमानच्या कारागृहावर भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण केले. व या तुरंगातील कैदींना मुक्त केले. जपानच्या पारतंत्र्यातुन अंदमान निकोबारला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबारला स्वंतत्र केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये उभारलेल्या राष्ट्रध्वजाच्या त्या ऐतिहासीक स्थळाला आज रामदास आठवले यांनी भेट देवुन राष्ट्रध्वजाला सलामी देत मानवंदना दिली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन केले.

ML/KA/PGB
25 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *