काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांना बदनाम करीत आहेत…

 काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांना बदनाम करीत आहेत…

नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचा बंधुनी, त्यांच्या कुटुंबियांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग देश कधीही विसरू शकत नाही.. परंतु काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांना बदनाम करीत असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे… Some people are deliberately maligning Savarkar…
ते काल रात्री नागपुरात राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि अनुनाद कलाविष्कार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर घराण्यातील महिलांची धगधगती जीवनगाथा दर्शवणारा “त्रिवेणी” या महानाट्य प्रसंगी बोलत होते…

नागपुरातील कवीवर्य सुरेश भट सभागृहात या महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते…देशाचा स्वातंत्र्यासाठी विनायक दामोदर सावरकरांनी ज्या यातना भोगल्या तेवढ्या यातना कुणीही भोगल्या नसल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.. त्यामुळे आता या महानाट्याचा समावेश येणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात करण्यात येईल अशी घोषणाही गडकरी यांनी केली . स्वा. विनायक दामोदर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि नारायणराव सावरकर यांनी राष्ट्रकार्यार्थ केलेला त्याग आणि भोगलेल्या यातना असीम आहेत. त्यांच्या या राष्ट्रकार्यामध्ये या तिन्ही भावंडांच्या पत्नीदेखील यज्ञ कुंडातल्या समिधा होऊनच जगल्या. त्यांच्या या त्यागाचे स्मरण करुन देणाऱ्या “त्रिवेणी” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले होते..

ML/KA/PGB
25 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *