टायटन पाणबुडी अपघातात प्राण गमावलेल्या जगप्रसिद्ध व्यक्ती

 टायटन पाणबुडी अपघातात प्राण गमावलेल्या जगप्रसिद्ध व्यक्ती

न्यूयॉर्क, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेला पूर्ण आठवडाभर संपूर्ण जग एखाद्या थरारपटात शोभेल अशा भीषण अपघात घटनेचे साक्षीदार झाले होते. १९१२ साली जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक या महाकाय बोटीच्या अवशेषांची पहाणी करण्यासाठी समुद्र तळाशी गेलेल्या जगातील ५ अब्जाधिशांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि महासत्ता अमेरिकेसह, कॅनडा आणि जगातील अन्य तत्रप्रगत देशांचे नौदल तज्ज्ञ या दुर्दैवी पर्यटकांना वाचवण्याच्या कामगिरीला लागले. पण अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांचा जीव वाचवणे शक्य झाले नाही.

पाणबुडी शोधण्यासाठी यूएस आणि कॅनडातील 3 सी-130 हर्क्युलस विमाने पाण्याखालील रोबोटसह पाठवण्यात आली. याशिवाय शोध मोहिमेत एक पी-8 विमान आणि 2 कॅनडाच्या पृष्ठभागावरील जहाजांचाही सहभाग होता.मात्र या सर्व प्रयत्नांना अपयश आले. या पाणबुडीमध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हमिश हार्डिंग होते, त्यांनी चित्ता भारतात आणण्यात मदत केली होती.याशिवाय पाणबुडीमध्ये फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री, पाकिस्तानी-ब्रिटिश उद्योगपती शहजादा दाऊद, त्याचा मुलगा सुलेमान आणि ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश उपस्थित होते. सुलेमान दाऊद हा केवळ १९ वर्षांचा होता.

टायटनमध्ये जीव गमावलेल्या ५ व्यक्तींबाबत

स्टॉकन रश
ब्रिटीश व्यावसायिक असलेल्या स्टॉकन रश यांनी २००९ मध्ये ओशन गेट नावाच्या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी महासागराच्या पृष्ठभागाखाली २० हजार फुटांपर्यंत प्रवास करू शकणार्‍या पाणबुडीची निर्मिती करते. १९८९ मध्ये त्यांनी स्वतःचं प्रायोगिक विमान तयार केलं. सोनार सिस्टीम, सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोल्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच सिएटलमधील ‘द म्युझियम ऑफ फ्लाइट’मध्ये त्यांनी बोर्ड आणि डेव्हलपमेंट टीम्समध्ये देखील काम केलं होतं.

हमिश हार्डिंग
हार्डिंग हे अॅक्शन एव्हिएशन या विमान विक्री आणि कन्सल्टिंग कंपनीचे अध्यक्ष होते. नासाचे निवृत्त अंतराळवीर टेरी व्हर्ट्स यांनी त्यांचे मित्र हार्डिंग यांच्याबद्दल माहिती दिली. हार्डिंग यांनी महासागराच्या खोल प्रदेशात क्रूड जहाजाद्वारे सर्वात जास्त कालावधीसाठी आणि सर्वात लांब अंतर प्रवास करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील मोडलेला आहे.

पॉल-हेन्री नार्गोलेट
पॉल-हेन्री नार्गोलेट यांना जहाजांबद्दल असलेलं ज्ञान आणि कौशल्यामुळे पॉल-हेन्री नार्गोलेट ‘मिस्टर टायटॅनिक’ म्हणून ओळखले जायचे. फ्रेंच नौदलात २२ वर्षे सेवा करणाऱ्या नार्गोलेट यांना कमांडरपद मिळालं होतं. १९८६ मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी ‘फ्रेंच इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड एक्स्प्लॉयटेशन ऑफ द सी’ इथे दोन डीप-सी सबमर्सिबलची देखरेख केली. तिथे असतानाच त्यांनी टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत फर्स्ट रिकव्हरी डाईव्ह केली होती.

शहजादा दाऊद
शहजादा दाऊद हे पाकिस्तानी ऊर्जा गुंतवणूक कंपनी एनग्रो तसेच दाऊद हर्क्युलस कॉर्प या दोन कंपन्याचे उपाध्यक्ष होते. त्यांनी SETI इन्स्टिट्युट, नानफा संस्था, प्रिन्स चार्ल्सची धर्मादाय संस्था, प्रिन्स ट्रस्ट इंटरनॅशनल अशा विविध कंपन्या आणि संस्थाच्या बोर्डमध्ये काम केलं होतं. त्यांनी यूकेमधील बकिंगहॅम युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी आणि फिलाडेल्फिया विद्यापीठातून ग्लोबल टेक्सस्टाईल मार्केटिंग विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं होतं.

सुलेमान दाऊद
शहजादा दाऊद यांचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. त्याने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मेजरचं पहिलं वर्ष पूर्ण केलं होतं. तोही वडिलांबरोबर टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेला होता. वडिलांबरोबर सुलेमानचाही या मोहिमेत मृत्यू झाला.

SL/KA/SL

23 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *