उद्धव ठाकरेंनी महेबूबा मुफ्तीच्या मांडीला मांडी लावून बसणं यासारखे दुर्दैव नाही
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्धव ठाकरे हे आंधळेपणाने राजकारण करताना दिसत आहेत. मुफ्तीच्या काळात पाकिस्तानचे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न झाला, ज्या कारणास्तव आमच्यावर टीका केली गेली आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं यासारखे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे भाजपा द्वेशाने आणि सत्तेसाठी आंधळे झाले आहेत. म्हणून अशा प्रकारचे कृत्य करताना दिसत आहेत. देशप्रेमी जनता उद्धव ठाकरे यांना कधीच माफ करणार नाही असा टोला भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी लगावला.
अशा प्रकारची बैठक मागच्या वेळेलाही झाली होती. 52 नेते, विविध पक्ष एकत्र आले होते, आणाभाका घेतल्या होत्या. त्यावेळी देशात काय परिस्थिती झाली होती ते पाहिले होते. आता तर देश मोदींच्या नेतृत्वाखाली खूप पुढे गेला आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. इकोनॉमी ग्रोथ कशा प्रकारे होतोय हे गडकरी यांनी सांगितले आहे. बदलता भारत, प्रगतीशील भारत होताना दिसत आहे. त्यामुळे देशवासियांना पहिल्यापेक्षा अधिक विश्वास मोदींच्या नेतृत्वावर वाढला आहे. त्यामुळे अशी कितीही मोट बांधली तर काही फरक पडत नाही. देशातील जनता मोदींच्या पाठीशी उभी आहे. कितीही नेते, पक्ष एकत्र आले तरी जनता भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनाच पाठबळ देईल यावर आमचा विश्वास आहे,असे ही दरेकर म्हणालेUddhav Thackeray sitting on Mahebuba Mufti’s lap is not as unfortunate as this
ML/KA/PGB
23 Jun 2023