वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने जिंकले ”कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत कांस्य पदक.

 वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने जिंकले ”कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत कांस्य पदक.

ठाणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दक्षिण आफ्रिकेतील अतिशय खडतर अशी मानली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा. या स्पर्धेत 20 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. 10 अंश तापमानात आयोजित करण्यात येणारी 89 किलोमीटरची ही स्पर्धा अवघ्या 10 तास 58 मिनिटात पूर्ण करून ठाण्यातील रामनाथ मेंगाळ या वाहतूक पोलीस हवालदाराने देशाचे नाव अटकेपार नोंदले आहे.

11 जून 2023 , सकाळी 5:30 ते सायंकाळी5:30 वाजेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत रामनाथ मेंगाळ यांनी अवघ्या 10 तास 58 मिनिटात 89 किलोमीटरचे अंतर पार केल्याने त्यांना कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले, त्यांच्या बरोबर महाराष्ट्र पोलीस खात्यातून तीन याधिकारी यांनी सह स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, यापैकी ठाण्यातील रामनाथ मेंगाळ यांनी सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत आपले नाव कोरले आहे .Traffic Police Constable won bronze medal in ‘Comrade Marathon’.

28 ऑगस्ट 2022 रोजी सलग 9 तास 37 मिनिटे इतका रेकॉर्ड करण्यात आला होता. यामुळे सलग दोन वर्ष या स्पर्धेत सहभाग नोंदविल्यामुळे रामनाथ यांना ‘बॅक टू बॅक’ या पदकाने सन्मानित करण्यात आले, ठाणे वाहतूक शाखेत कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असताना स्वतःच्या शारीरिक फिटनेसकडे लक्ष देत या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी रामन्नाथ मेंगाळ यांचे वरिष्ठ सहकारी हेही उपस्थित होते.

मेंगाळ यांची कामगिरी पाहता त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, वाहतूक कॉन्स्टेबल या पदावर जबाबदारी सांभाळत असताना रमन्नाथ मेंगाळ यांनी केलेल्या या कामगिरीमुळे पोलीस खात्यातील अनेक खेळाडूंसमोर ते आदर्श ठरणार आहेत.

ML/KA/PGB
23 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *