भटक्या मांजरांचे होणार लसीकरण आणि निर्बिजीकरण ….

 भटक्या मांजरांचे होणार लसीकरण आणि निर्बिजीकरण ….

पनवेल, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनवेल महानगर पालिकेच्यावतीने भटक्या मांजरांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण केंद्राचे उद्घाटन पोदी येथील श्वान नियंत्रण केंद्राच्या वरील मजल्यावरती आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

भटक्या मांजराच्या संख्येवर नियंत्रण आणणेकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या माजंरासाठी नसबंदी कायदा राबविण्याच्या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या, त्याप्रमाणे इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, इंडिया संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने भटक्या मांजराचे लसीकरण व निर्बिजीकरण केंद्र सरू केले आहे.

या केंद्रामध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील भटक्या मांजरी तसेच भटक्या मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येत आहे. वर्षाला सरासरी ३०० मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण व २०० आजारी मांजरींवर औषधोपचार करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या या केंद्रावरती दर मंगळवार, गुरूवार, शनिवार मांजरीचे ९ ते ५ यावेळेत लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येणार आहे.महापालिकेकडे या केंद्राकडे चार रूग्णवाहिका असून महापालिकेतील या वाहिकेच्या माध्यमातून भटके कुत्रे व भटके मांजर पकडण्यात येणार आहे.

ML/KA/PGB
23 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *