सूर्यालक्ष्मी कॉटन मिल ला आग, करोडोचे नुकसान
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील रामटेक पासून 10 किमी अंतरावर असलेल्या नगरधन येथील सूर्यलक्ष्मी कॉटन मिलच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत कापूस, कापसाची गाठ, सुताचे बंडल, तयार कपड्याच्या गाठी आणि एक मशीन मिळून करोडोचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.
आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच रामटेक नगर परिषद अग्निशमन, कामठी नगर परिषद, अल्ट्रा टेक सिमेंट, एन टी पी सी मौदा आदींच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ML/KA/PGB
23 Jun 2023