योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.Make yoga a part of your daily life
विधान भवन प्रांगणात योगप्रभात @ विधान भवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल आपले विचार व्यक्त करीत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार मनीषा कायंदे, संजय कुटे, विक्रम काळे आदी उपस्थित होते.
योगामुळे आत्मविश्वास, सहनशक्ती वाढीस लागत असल्याचे सांगत राज्यपाल बैस म्हणाले, की संपूर्ण जगात योगाभ्यास होत आहे. योगाचा संपूर्ण जगात प्रचार झाला पाहिजे, नव्या पिढीला योग शिकविणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे सामर्थ्य योगात आहे. देशात मधुमेह आजार वेगाने वाढत आहे. या आजारावर योगाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सर्वाधिक युवा शक्तीचा देश भारत आहे.
युवाशक्ती ने योग केला पाहिजे. ही योग चळवळ पुढे नेली पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांना योगामुळे व्यसनांपासून दूर राहता येवू शकते. देशात योग विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तणाव मुक्तीसाठी प्रत्यके कार्यालयात किमान १५ मिनिटे योग अभ्यास झाला पाहिजे.
ML/KA/PGB
21 Jun 2023