चांदोबाचे लिंब इथे माऊलीचे पहिले उभे रिंगण

 चांदोबाचे लिंब इथे माऊलीचे पहिले उभे रिंगण

सातारा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबा लिंब येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी लोणंद येथे येथून इथून तरडगाव फलटण या ठिकाणी निघालेली आहे. या मार्गावरील चांदोबाचा लिंब या ठिकाणी चांदोबाचे मंदिर आहे. सुमारे चारशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथ या ठिकाणी काही वेळ विसावतो. त्यानंतर माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविक हजारोच्या संख्येने दोन्ही बाजूला टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करीत असतात Mauli’s first vertical arena here is Chandoba Limb.

या पहिल्या उभ्या रिंगणासाठी मार्ग तयार करतात. कर्नाटक राज्यातील चिकोडी अंकली येथील महाजी राजे शितोळे सरकार यांच्या हिरा आणि मोती या अश्वांचा मान पालखी सोहळ्यात असतो. ज्ञानेश्वर माऊलीच्या रथावरील चोपदाराच्या हातातील दंडाच्या इशाऱ्या नंतर या उभ्या रिंगणास सुरुवात झाली. काही क्षणातच अश्वांनी हे रिंगण पूर्ण केले. ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोषणात अश्वाच्या पायाखालची माती वारकऱ्यांनी आपल्या मस्तकी लावून माऊलीचा जयघोष केला. या पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याची आधी सुविधा प्रशासनाने दिलेल्या आहेत..

ML/KA/PGB
20 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *