बालकांना मिळत आहेत योग विद्येचे धडे….
नाशिक, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक योग दिनाचे आणि आयुर्वेदातल्या योगक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना बालकांना कळावे ,त्यामुळे त्यांनी आरोग्य संपन्न व्हावे यासाठी उद्याच्या योग दिनाच्या निमित्ताने नाशिक येथील शाळांमधून विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे शिकविले जात आहेत. नाशिक येथे रचना विद्यालय आणि इतर अनेक शाळांमध्ये योग विद्या धाम मधून प्रशिक्षित झालेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या शिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण दिले जात असून महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या रचना विद्यालयात योग शिक्षिका नेहा संजय शेंडे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देत आहेत.Children are getting yoga lessons.
शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी या योग प्रशिक्षणात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असून उद्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या शहरातील सर्वात मोठ्या कार्यक्रमात हे विद्यार्थी सहभागी होऊन योगाभ्यास करणार आहेत. जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक संस्था आणि हजारो साधक या योग अभ्यासात सहभागी होणार आहेत.
ML/KA/PGB
20 Jun 2023