आशियायी तलवारबाजी चॅम्पिअनशिपमध्ये तळपली ‘भवानी’ ची तलवार
नवी दिल्ली,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भवानी हे नाव सार्थ ठरवत आशियायी तलवारबाजी चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय तलवारपट्टू भवानी देवी हीने विक्रमी कामगिरी केली आहे. भवानीने आज जपानच्या मिसाकी चा १५-१० असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
या स्पर्धेत पदक मिळवणारी भवानी ही पहिली भारतीय आहे. २९ वर्षीय भवानीने २००४ मध्ये करिअरची सुरुवात केली. २०१२ च्या जर्सी कॉमनवेल्थ चॅम्पिअनशिपमध्ये तिने रोप्य आणि कांस्य पदक जिंकले होते.
आशियायी तलवारबाजी चॅम्पिअनशिपमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आता भवानीला उझबेकीस्तानच्या झेनव डेबेकोवाशी झुंज द्यावी लागणार आहे.
SL/KA/SL
19 June 2023