या राज्यात लम्पीमुळे नुकसान झालेल्या पशुपालकांना मोठी मदत

जयपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्यावर्षी पाळीव पशुंना झालेल्या लम्फीया त्वचेच्या आजारामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला होता. शेतीचा भार उचलणारे जीवलग पशु गतप्राण झाल्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यावर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध राज्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले तरी देखील झालेली हानी ही भरुन निघणारी नव्हती. लम्पीमुळे राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधनांचा मृत्यू झाला होता. यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्याची राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणा केली आहे.राज्यातील लम्पीचा प्रादुर्भाव आोटक्यात आणण्यात अपयशी ठरलेल्या गेहलोत सरकारवर त्यावेळी टीका झाली होती.
लम्पीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राजस्थान सरकारने मदत केली आहे.लम्पीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशा शेतकऱ्यांना गेहलोत सरकारने नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. यानुसार, लम्पीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ४० हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ४१ हजार शेतकऱ्यांना १७५ कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेणारा पशुपालक हा राजस्थानचा रहिवाशी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच त्याचे वय १८ पेक्षा जास्त असावे. या योजनेचा लाक्ष केवळ शेतकरी आणि पशुपालक हेच घेवू शकतात. आठ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या पशुपालकांच्या विम्याचा संपूर्ण प्रीमियम राज्य सरकार भरणार आहे. तर इतर पशुपालकांना वार्षिक २०० रुपये विमा हप्ता भरावा लागले.
SL/KA/SL
17 June 2023