आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने 76 विशेष रेल्वे

नागपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोट्यवधी वारकऱ्यांच्या आस्थेचा विषय असलेल्या पंढरपूर वारीने मध्य रेल्वेलाही आकर्षित केले आहे. वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने यंदा मध्य रेल्वेतर्फे पंढरपूर आषाढी वारीसाठी तब्बल 76 रेल्वे गाड्या चालविण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे. 76 special trains on behalf of Central Railway for Ashadhi Wari
नागपूर वरुन मिरज, नागपूर-पंढरपूर यासह नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुरूडवाडी या विशेष गाड्या पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त चालविल्या जाणार आहेत परिणामी लाखो भाविकांची प्रवासाची सोय होणार आहे.
ML/KA/PGB
17 Jun 2023