बाजार(Stock Market) विक्रमी शिखराजवळ

मुंबई, दि. 17 (जितेश सावंत): जागतिक बाजारातील सकारात्मकता, देशांतर्गत डेटा,मजबूत FII गुंतवणूक या जोरावर भारतीय बाजाराने आठवड्याचा शेवट विक्रमी उच्चांकी पातळीवर केला. यूएस फेडचे आणखी दोन दर वाढीचे संकेत,चीनमधील मंदावलेली वाढ आणि भारताची वाढती व्यापार तूट(भारताची व्यापार तूट 5 महिन्यांच्या उच्चांकावर) rising trade deficit.याकडे बाजाराने दुर्लक्ष केले.चांगल्या CPI, WPI आणि IIP डेटाने गुंतवणूकदारांचा आशावाद पल्लवित झाला.
शुक्रवारी यूएस मार्केटमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून प्रॉफिट बुकिंग झाले.Nasdaq आणि S&P 500च्या सलग 6 दिवसांच्या रॅलीवर ब्रेक लागला,DowJones देखील दिवसाच्या उच्चांकावरून 200 अंकांनी घसरला.
Technical view on nifty-मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे वरच्या स्तरावर निफ्टीने 18739 चा महत्वाचा टप्पा पार करून ऑल टाईम हाय जा जवळ जाण्याचा प्रयत्न केला.शुक्रवारी निफ्टीने 18864 ची पातळी गाठली व 18826 चा बंद दिला.
बाजार या आठवड्यात विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता अधिक आहे.
शुक्रवारी निफ्टीने 18826चा बंद भाव दिला. निफ्टीसाठी18755-18723-18690-18631हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रधानमंत्री मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे असेल.
बाजार किरकोळ वाढीसह बंद
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने दोन दिवसांच्या घसरणीची साखळी तोडली.बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली आणि निफ्टी इंट्राडे 18,650 च्या पातळीजवळ जात असताना नफावसुली झाली. कॅपिटल गुड्स वगळता सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली.बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 99.08 अंकांनी वधारून 62,724.71 वर बंद झाला.
दुसरीकडे निफ्टीत 38.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,601.50 चा बंद दिला. Nifty ends flat भारताचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई मे महिन्यात 4.25 टक्क्यांवर घसरली आहे,.India’s consumer price index (CPI)-based inflation fell to 4.25 per cent in May
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) एप्रिलमध्ये 4.2 टक्क्यांनी वाढला. The Index of Industrial Production (IIP) rose 4.2 per cent in April
सेन्सेक्स 418 अंकांनी वधारला. सकारात्मक देशांतर्गत डेटा, जागतिक बाजारपेठामधील सकारात्मकता आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर विराम देण्याची अपेक्षा यामुळे भारतीय निर्देशांकांना सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा सिलसिला सुरु ठेवण्यास मदत झाली.निफ्टीने वाढीसह उघडून दिवसाच्या उच्चांकाच्या आसपास बंद दिला.
परंतु सेन्सेक्स-निफ्टीची विक्रमी उच्चांक गाठण्यासाठी लपाछुपी सुरूच राहिली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 418.45 अंकांनी वधारून 63,143.16 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 114.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,716.20 चा बंद दिला. Nifty holds 18,700
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी होताना दिसली अस्थिर अश्या सत्रात बाजाराने तेजी टिकवली. यूएस चलनवाढ (महागाईचे आकडे)दोन वर्षांहून अधिक काळातील नीचांकी पातळीवर आल्यानंतर, गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या धोरणाच्या बैठकीच्या निकालाची आणि पुढील धोरण मार्गदर्शनाची वाट पाहत होते. भारताचा घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई एप्रिलमधील -0.92 टक्क्यांवरून मे महिन्यात -3.48 टक्क्यांवर घसरला.यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.दिवसभराच्याअखेरीससेन्सेक्स 85.35 अंकांनी वधारून 63,228.51 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 39.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,755.90 चा बंद दिला. Sensex rises for 3rd straight day
बाजाराची तीन दिवसांची विजयाची मालिका खंडित
गुरुवारी मार्केटने आपला तीन दिवसांचा विजयी सिलसिला तोडला. जूनच्या बैठकीत व्याजदर वाढीचा पॉज घेऊन देखील यूएस फेडरल रिझर्व्हने आणखी दोन दर वाढीचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली.दिवसभराच्याअखेरीस सेन्सेक्स 306 अंकांनी घसरून 62,921.58 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 72 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,683.90 चा बंद दिला. Market snaps 3-day gaining streak
बाजार विक्रमी पातळीवर बंद
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अमेरिकी बाजारातील तेजीच्या जोरावर निफ्टीमध्ये जोरदार सुरुवात झाली व त्यामुळे बाजारात दुपारपर्यंत तेजी पसरली.रिलायन्स आणि बँक निफ्टीकडून मिळालेल्या सपोर्टमुळे सत्राच्या उत्तरार्धात त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले.तसेच जागतिक एजन्सीकडून रेटिंग अपग्रेड मिळविण्यासाठी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिससोबत सरकारच्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली. बाजार विक्रमी पातळीवर बंद झाला. दिवसभराच्याअखेरीससेन्सेक्स 466.95 अंकांनी वधारून 63,384.58 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 137.90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,826 चा बंद दिला. Nifty, Sensex record closing high
(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)
jiteshsawant33@gmail.com
बाजार(Stock Market) विक्रमी शिखराजवळ
जितेश सावंत
जागतिक बाजारातील सकारात्मकता, देशांतर्गत डेटा,मजबूत FII गुंतवणूक या जोरावर भारतीय बाजाराने आठवड्याचा शेवट विक्रमी उच्चांकी पातळीवर केला. यूएस फेडचे आणखी दोन दर वाढीचे संकेत,चीनमधील मंदावलेली वाढ आणि भारताची वाढती व्यापार तूट(भारताची व्यापार तूट 5 महिन्यांच्या उच्चांकावर) rising trade deficit.याकडे बाजाराने दुर्लक्ष केले.चांगल्या CPI, WPI आणि IIP डेटाने गुंतवणूकदारांचा आशावाद पल्लवित झाला.
शुक्रवारी यूएस मार्केटमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून प्रॉफिट बुकिंग झाले.Nasdaq आणि S&P 500च्या सलग 6 दिवसांच्या रॅलीवर ब्रेक लागला,DowJones देखील दिवसाच्या उच्चांकावरून 200 अंकांनी घसरला.
Technical view on nifty-मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे वरच्या स्तरावर निफ्टीने 18739 चा महत्वाचा टप्पा पार करून ऑल टाईम हाय जा जवळ जाण्याचा प्रयत्न केला.शुक्रवारी निफ्टीने 18864 ची पातळी गाठली व 18826 चा बंद दिला.
बाजार या आठवड्यात विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता अधिक आहे.
शुक्रवारी निफ्टीने 18826चा बंद भाव दिला. निफ्टीसाठी18755-18723-18690-18631हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रधानमंत्री मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे असेल.
बाजार किरकोळ वाढीसह बंद
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने दोन दिवसांच्या घसरणीची साखळी तोडली.बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली आणि निफ्टी इंट्राडे 18,650 च्या पातळीजवळ जात असताना नफावसुली झाली. कॅपिटल गुड्स वगळता सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली.बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 99.08 अंकांनी वधारून 62,724.71 वर बंद झाला.
दुसरीकडे निफ्टीत 38.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,601.50 चा बंद दिला. Nifty ends flat भारताचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई मे महिन्यात 4.25 टक्क्यांवर घसरली आहे,.India’s consumer price index (CPI)-based inflation fell to 4.25 per cent in May
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) एप्रिलमध्ये 4.2 टक्क्यांनी वाढला. The Index of Industrial Production (IIP) rose 4.2 per cent in April
सेन्सेक्स 418 अंकांनी वधारला. सकारात्मक देशांतर्गत डेटा, जागतिक बाजारपेठामधील सकारात्मकता आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर विराम देण्याची अपेक्षा यामुळे भारतीय निर्देशांकांना सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा सिलसिला सुरु ठेवण्यास मदत झाली.निफ्टीने वाढीसह उघडून दिवसाच्या उच्चांकाच्या आसपास बंद दिला.
परंतु सेन्सेक्स-निफ्टीची विक्रमी उच्चांक गाठण्यासाठी लपाछुपी सुरूच राहिली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 418.45 अंकांनी वधारून 63,143.16 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 114.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,716.20 चा बंद दिला. Nifty holds 18,700
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी होताना दिसली अस्थिर अश्या सत्रात बाजाराने तेजी टिकवली. यूएस चलनवाढ (महागाईचे आकडे)दोन वर्षांहून अधिक काळातील नीचांकी पातळीवर आल्यानंतर, गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या धोरणाच्या बैठकीच्या निकालाची आणि पुढील धोरण मार्गदर्शनाची वाट पाहत होते. भारताचा घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई एप्रिलमधील -0.92 टक्क्यांवरून मे महिन्यात -3.48 टक्क्यांवर घसरला.यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.दिवसभराच्याअखेरीससेन्सेक्स 85.35 अंकांनी वधारून 63,228.51 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 39.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,755.90 चा बंद दिला. Sensex rises for 3rd straight day
बाजाराची तीन दिवसांची विजयाची मालिका खंडित
गुरुवारी मार्केटने आपला तीन दिवसांचा विजयी सिलसिला तोडला. जूनच्या बैठकीत व्याजदर वाढीचा पॉज घेऊन देखील यूएस फेडरल रिझर्व्हने आणखी दोन दर वाढीचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली.दिवसभराच्याअखेरीस सेन्सेक्स 306 अंकांनी घसरून 62,921.58 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 72 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,683.90 चा बंद दिला. Market snaps 3-day gaining streak
बाजार विक्रमी पातळीवर बंद
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अमेरिकी बाजारातील तेजीच्या जोरावर निफ्टीमध्ये जोरदार सुरुवात झाली व त्यामुळे बाजारात दुपारपर्यंत तेजी पसरली.रिलायन्स आणि बँक निफ्टीकडून मिळालेल्या सपोर्टमुळे सत्राच्या उत्तरार्धात त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले.तसेच जागतिक एजन्सीकडून रेटिंग अपग्रेड मिळविण्यासाठी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिससोबत सरकारच्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली. बाजार विक्रमी पातळीवर बंद झाला. दिवसभराच्याअखेरीससेन्सेक्स 466.95 अंकांनी वधारून 63,384.58 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 137.90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,826 चा बंद दिला. Nifty, Sensex record closing high
(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)
ML/KA/PGB
17 Jun 2023