वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे

 वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे

यवतमाळ, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड गावानजिक येथील भूशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांना ६ कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर प्राण्यांचे जीवाष्म सापडले आहेत.दोन वर्षांपूर्वी पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 वर्षापासून भूगर्भाचा अभ्यास करीत आहेत.
ह्यापूर्वी त्यांनी पांढरकवडा,
राळेगाव,झरी तालुक्यात 6 कोटि वर्षाच्या शंख-शिपल्याची जिवाष्मे तर 150 कोटी वर्षं पूर्वीची स्ट्रोमॅटोलाईट ची जिवाष्मे शोधून काढली आहेत.
त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 25 हजार वर्ष पूर्वीची पाषाणयुगीण अवजारे सुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तीगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी प्रदर्शित करून ठेवली आहेत. Fossils of giant dinosaurs were found near Vani

वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोईक ह्या 150 कोटी वर्षे दरम्यानच्या काळातील पैनगंगा गृपचा चुनखडक असून त्या काळात इथे समुद्र होता.जुरासिक काळात इथे विशालकाय अश्या डायनोसॉर प्राण्यांचा विकास झाला.परंतु 6 कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसॉर मारले गेले.इथे बेसाल्ट ह्या अग्निजन्य खडकाच्या रुपाने ते पुरावे आजही ते पाहायला मिळतात .परंतू अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत.

जीवाश्मांच्या आकार,
प्रकारावरून ,स्थळावरून ,काळावरून आणि भूशास्त्र विभागाचे तज्ज्ञांच्या मतानुसार हे जीवाष्म डायनोसॉर चेच आहे असा विश्वास चोपणे ह्यानी व्यक्त केला.

ML/KA/PGB
16 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *