मुंबई लोकलमधील बलात्काराच्या घटनेची महिला आयोगाने घेतली दखल
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी 10 च्या सुमारास धावत्या लोकलमध्ये एका वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून संबंधितांना याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. The women’s commission took notice of the rape incident in Mumbai local
मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात 20 वर्षीय तरुणीवर 40 वर्षीय नराधमाने अत्याचार केला.या घटनेची
या घटनेवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी इन्स्टाग्रावर व्हिडीओ शेअर करत या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे, अशी माहिती दिली. “मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना अतिशय संतापजनक आहे. दररोज पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत लाखो महिला मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र या घटनेने प्रवासात महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत सकाळीसुद्धा महिला सुरक्षित नसणं ही चिंताजनक बाब आहे. सकाळी साडे-सातच्या सुमारास तरुणीवर अत्याचार होणे हे सुरक्षा यंत्रणांचेच अपयश आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून संबंधितांना याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
ML/KA/PGB
15 Jun 2023