दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुन्हा भारतीय दलित पँथरची गरज – केंद्रीयमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी पुन्हा भारतीय दलित पँथर स्थापनेची गरज निर्माण झाली आहे. आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही मात्र कोणावर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही.अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही भारतीय दलित पॅंथर संघटनेची स्थापना करण्याचा विचार करीत आहोत. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
वसई येथे वसई – विरार जिल्हा रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा अयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रामदास आठवले बोलत होते. यावेळी तथागत भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सवही साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन रामदास आठवले बोलत होते.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे वसई -विरार जिल्हाध्यक्ष अॅड. ईश्वर धुळे हे अध्यक्षस्थानी होते. प्रभारी मंचावर मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, ठाणे प्रदेशाध्यक्ष बाळाराम गायकवाड, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, प्रकाश जाधव तसेच वसई विरारचे रिपाइं नेते डी.बी. गमरे, हेमंत कोल्हे, संतोष धुळे, रामनरेश जयस्वाल, शैलेश सपकाळ, राजेंद्र धुपके, सुनिल लोखंडे, दिपक कांबळे, प्रेम सागर इटवे, संतोष रोडे आदि मान्यंवर उपस्थित होते.
अन्यायाचा प्रतिकार करणारे आक्रमक संघटक म्हणुन भारतीय दलित पँथरने आपला देशात वचक निर्माण केला होता. भारतीय दलित पँथरच्या माध्यमातुन आम्ही मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले पाहिजे या मागणीसाठी अनेक वर्षे नामांतराचा लढा लढला. नामांतराच्या लढयात भारतीय दलित पँथरचे अनेक आंदालने केली, मोर्चे काढले. या आठवणी ना. रामदास आठवले यांनी यावेळी सांगितल्या.
महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता हाती घ्या. सत्तेची आणि मोक्याची स्थाने हाती घ्या. आणि सत्ताधारी होण्याच्या दिशेने वाटचाल करा हा संदेश दिला होता. त्यानुसार सत्तेमध्ये आपला प्रयत्न राहिला आहे. त्यासाठी आपआपल्या भागातील नगरसेवक, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडुन आले पाहिजे यासाठी सर्वांनी मिळुन एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. आता आपला पक्ष वाढत आहे. नागालँडमध्ये आपले 2 आमदार निवडुन आले आहेत. अंदमान निकोबार मधील पोर्टब्लेयर येथे येत्या 25 जुन रोजी आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती ना. रामदास आठवलेंनी दिली. जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडुन आणुन पक्ष मजबुत करण्याचे कार्यकर्त्यांना रामदास आठवले यांनी आवाहन केले.Union Minister Ramdas recalled the need for Indian Dalit Panthers again to prevent atrocities on Dalits
ML/KA/PGB
15 Jun 2023