अनपेक्षित राजकीय घडामोडींबाबत काय सांगते ज्योतिषशास्त्र…
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राजकीय पेच गुरुवारी संपुष्टात आला. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले. आणि ते नाव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.या पदाकरिता ते इच्छुक असूनही ते त्यांना मिळाले नाही. या मागील कारणांचा ज्योतिषशात्राच्या आधारे या शास्त्र्याचे अभ्यासक जितेश सावंत यांनी घेतलेला हा आढावा.
एकनाथ शिंदे : जन्म ०९ फेब्रुवारी १९६४. यांच्या पत्रिकेचा विचार करीता धनु राशीची व वृषभ लग्नाची पत्रिका आहे. सध्या राहूची महादशा व शुक्राची अंतर्दशा सुरु आहे( जुलै २०२४ पर्यंत). पत्रिकेतील शुक्राचा नक्षत्रस्वामी शनी. शुक्र लाभ स्थानात मीन राशीच्या गुरूबरोबर, शुक्राचा संबंध प्रथम स्थानाशी,तसेच षष्ठ स्थानाशी (या स्थानावरून स्पर्धात्मक यश बघतात) आल्याने सुंदर योग जुळून आला. त्याबरोबर मूळ पत्रिकेत शनी कुंभ राशीत असून दशमस्थांनातं आहे. सध्या देखील शनी हा कुंभ राशीत आहे.या स्थानातील शनीमुळे मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अजून सुकर झाला.
सध्याच्या राजकारणात (कलियुगातील) सत्ता काबीज करण्यासाठी राहूची साथ असणे फार महत्वाचे असते.सत्ताधारी पक्षाचे आसन डळमळीत करण्याचे /आसनाला सुरुंग लावण्याचे सामर्थ्य या ग्रहात आहे
देवेंद्र फडणवीस– जन्म २२ जुलै १९७० यांच्या पत्रिकेचा विचार करीता कुंभ रास व कर्क लग्नाची पत्रिका. सध्या त्यांची केतूची महादशा व केतूचीच अंतर्दशा सुरु आहे. केतूची दृष्टी अष्टमस्थानावर आहे, हे स्थान नुकसान/ व पराभवाचे आहे. केतूचा उपनक्षत्र स्वामी शनी असून शनी सध्या कुंभ राशीत आहे ती रास या पत्रिकेत अष्टम स्थानी आहे तसेच पत्रिकेतील शनी मेष राशीत असून निचीचा असल्याने त्यांना ह्या पदापासून वंचित राहावे लागले. केतू ह्या ग्रहाचे कारकत्व अस्थिरता, अशांती. जन्मभर दुःख सलत राहते. यामुळे पराभव/अपमान सहन करून पद मिळाले.
२०२४-२०२५ पर्यंत त्यांना हवी तशी इच्छापूर्ती होणे कठीण.
दिनांक ०४ मार्च २०२२ रोजी नवीन संवत्सर कसे राहील ? या लेखात जितेश सावंत यांनी -हे वर्ष सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल आहे. काही ठिकाणी सत्तापरिवर्तनाचे योग. काही राज्यात नेत्तृवबदलाची शक्यता अधिक .पक्ष फूटतील हे मत मांडले होते.
ML/KA/SL
11 July 2022