ऐकावं ते नवलचं, या देशात भाड्याने मिळतात नातेवाईक
![ऐकावं ते नवलचं, या देशात भाड्याने मिळतात नातेवाईक](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/06/Japanise-Family-700x560.jpg)
टोकीओ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिस्तप्रिय, शांतता प्रिय आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जपान या देशात जगातील सर्वांत जास्त वृद्ध व्यक्ती आहेत. तरुण- तरुणी करिअरला अधिक प्राधान्य देत असल्यामुळे आता नवीन मुले जन्माला येण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. मुलासाठी आई किंवा वडिलांची उणीव दूर करणे, एकटे राहणाऱ्यासाठी जोडीदाराची म्हणून तेथील लोक आता नातेवाईक भाडेतत्वावर मिळवत आहेत.
लोक आता काही तासांसाठी मित्र देखील भाड्याने मिळवत आहेत. येथे रोमँटिक साथीदार देखील भाड्याने मिळतो, भाड्याच्या पत्नीलाही आमंत्रित करता येते. संबंधित कंपन्यांकडून लोकांच्या पसंतीची काळजी घेती जाते. भावनात्मक पैलू देखील भाड्याने नातेवाईक उपलब्ध करताना विचारात घेतला जातो.
जपानी लोकांना ही सुविधा अत्यंत उत्तमप्रकारे प्राप्त होत आहे, एकीकडे हा प्रकार उद्योगाचे रुप धारण करतोय. लोकांना विविध नातेवाईकांसाठी कॅटेलॉग देखील उपलब्ध झाला आहे. वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी सहकारी असो किंवा वृद्ध लोकांना स्वत:च्या तरुण मुलामुलींसारख्या सहाऱ्याची गरज असो लोकांना सर्व पर्याय मिळू लागले आहेत.
2040 पर्यंत जपानमध्ये 40 टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये एकच व्यक्ती राहणार आहे आणि तो देखील विवाहाचे सरासरी वय ओलांडलेला असेल. बहुतांश लोकांकडे कुटुंबाच्या नावावर केवळ वृद्ध आईवडिलच असल्याने देशात कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणे अवघड ठरत चालल्याचे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
SL/KA/SL
13 June 2023