प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला

अयोध्या, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यवधी भारतीयांच्या ह्रदयात अढळ स्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या अयोध्या येथील मंदीराचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. नेपाळमधुन आणलेल्या विशेष शाळीग्राम शिळा वापरून प्रभू श्रीराम आणि सीतामाईंच्या मूर्ती घडवण्यात येत आहेत. या मूर्ती घडवण्याचे काम रात्रंदिवस सुरू असून रामलल्लांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. राम मंदिर न्यासाने मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जाहीर केला आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी मंदीराच्या गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदीर न्यासाकडून पंतप्रधानांना या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा हा भव्य कार्यक्रम पूर्ण एक आठवडा चालणार आहे.
प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच हे मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. प्रतिदिन १ लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा ठेवून अयोध्या नगरी सुसज्ज होत आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध मोठ्या मंदीरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
SL/KA/SL
13 June 2023