कंत्राटी ग्रामसेवकांच्या पगारात मोठी वाढ

 कंत्राटी ग्रामसेवकांच्या पगारात मोठी वाढ

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्राम पातळीवर राज्याच्या महसूल विभागासाठी कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक. राज्यशासन आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवकांच्या मानधनाचा बराच काळ रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे.

आज झालेल्या महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट मिटिंग आज पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे आणि काही इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्यातील सर्व मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीमध्ये कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचं मानधन थेट 10,000 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

राज्य सरकारच्या आजच्या निर्णयामुळे कंत्राटी ग्राम सेवकांना तब्बल १६ हजार वेतन मिळणार आहे. पूर्वी ह्या कंत्राटी ग्रामसेवकांना फक्त सहा हजार वेतन मिळत होते.

ग्रामपातळीवर प्रशासन, नियोजन, शेती विषयक योजना, कुटुंब कल्यान कार्यक्रम, कल्यानकारी योजना, गाव माहिती केंद्र, पशू संवर्धन योजना, संकीर्ण, आणि इतर योजना. ” हे सर्व कार्य पार पडण्याची जबाबदारी सरकारने ग्रामसेवकाला दिलेली आहे. एवढा प्रचंड कार्यभार असलेल्या ग्रामसेवकांना आता वेतनवाढीमुळे काहीसा दिलासा मिळून गावगाड्याची कामे जलद मार्गी लागतील अशी अपेक्षा ठेवता येईल.

SL/KA/SL
13 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *