अखेर राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल…

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):गेले अनेक दिवस बहुप्रतिक्षित असलेला आणि चक्रीवादळे तसेच अल निनो च्या प्रभावामुळे लांबलेल्या नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन अखेर राज्यात झाले असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.आज सकाळी दक्षिण कोकण ,दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग तसेच संपूर्ण गोवा , कर्नाटक , तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात या पावसाचे आगमन झाले आहे असे हवामान खात्याने आपल्या ट्विटर वर म्हटले आहे.सिंधुदुर्ग , रत्नागिरी , श्रीहरी कोटा , धुमरी , हसन या भागात मान्सूनच्या सरी आता बरसतील असेही यात म्हटले आहे. साधारणपणे एक जून ला केरळात दाखल होणारा मान्सून सात जून ला कोकणात दाखल होतो , मात्र यावेळी तो पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे. प्रचंड तळपत्या उन्हात आणि उष्म्यात तापलेल्या राज्यातील जनतेला यामुळे दिलासा देणारी ही बातमी आहे.
ML/KA/PGB 11 Jun 2023