राज्याचा १० वी चा निकाल ९३.८३ %, यंदाही कोकण अव्वल

 राज्याचा १० वी चा निकाल ९३.८३ %, यंदाही कोकण अव्वल

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा 93.83 टक्के निकाल लागला असून यावर्षी देखील यश संपादनाची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजेच गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून राज्यातील कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे 87 टक्के मुली पास झाल्या आहेत तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आला राज्यातील 15 लाख 79 हजार 371 विद्यार्थी परिक्षेत बसले होते. यापैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह पास झाले असून, 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 3 लाख 34 हजार 15 विद्यार्थी हे दुसऱ्या श्रेणीत पास झाले आहेत. तर 85 हजार 288 विद्यार्थ्याचा निकाल उत्तीर्ण श्रेणीत लागला आहे.

विभाग निहाय निकाल टक्केवारी

छत्रपती संभाजीनगर : 93.23 टक्के

कोकण: 98.11 टक्के

लातूर: 92.67 टक्के

मुंबई: 93.66 टक्के

पुणे: 95.64 टक्के

नागपूर: 92.05 टक्के

कोल्हापूर: 96.73 टक्के

अमरावती: 93.22 टक्के

नाशिक: 92.22 टक्के

मुलांचा निकाल 92.05 टक्के

मुलींचा निकाल. 95.87 टक्के

दिव्यांगांचा निकाल. 92.49 टक्के

SL/KA/SL

2 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *