या महिला बेसबॉल खेळाडूला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

 या महिला बेसबॉल खेळाडूला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

बारामती,दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बेसबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाची कर्णधार असलेल्या बारामतीच्या रेश्मा पुणेकर हिला महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारासाठी 30 जून रोजी संपणारे वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये त्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर केलेल्या कामगिरीचे व क्रीडानैपुण्याचे मूल्यमापन केले जाते.ग्रामीण भागामधून देशाच्या कर्णधार पदी कामगिरी करणाऱ्या रेश्मा पुणेकरने बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दोन आंतरराष्ट्रीय सामने,चीन आणि हॉंगकॉंग मध्ये खेळले आहेत.

रेश्माने 23 राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तिला आत्तापर्यंत 4 सुवर्ण पदक, 6 रजत पदक, 3 कांस्य पदक आणि रागिणी पुरस्कार, राज्यस्तरीय खेलरत्न पुरस्कार, सरदार धुळोजी मोरे वीरता पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. रेश्माची एक तपाहून अधिक काळाची कामगिरी इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. रेश्माच्या हा अथक मेहनतीमुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बेसबॉलमध्ये उंचावले आहे.

सध्या रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील शारीरिक शिक्षण विभागात एम.पी.एड पदवी अभ्यास करत आहे. बारामतीकर असलेल्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय खेळाडूला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
SL/KA/SL
2 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *