Reliance ला मागे टाकून TCS अव्वल स्थानी
मुंबई,दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी फर्म इंटरब्रँडने नुकत्याच जाहीर केलेल्या माहिती प्रमाणे जगप्रसिद्ध भारतीय IT कंपनी TCS ने देशात ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकत टीसीएसने हे स्थान मिळवले आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर आहे. TCS २०२३ मध्ये १.०९ लाख कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह ५० सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँडच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ६५,३२० कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. मुकेश अंबानी यांचे टेलिकॉम आणि डिजिटल युनिट जिओदेखील ४९,०२७ कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह पहिल्या ५ मध्ये आहे.
या क्रमवारीत इन्फोसिस ही आयटी कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू ५३,३२३ कोटी रुपये आहे. चौथ्या क्रमांकावर HDFC आणि पाचव्या क्रमांकावर Jio आहे. टॉप १० मध्ये Airtel, LIC, Mahindra, State Bank of India आणि ICICI यांचा समावेश आहे. एफएमसीजी हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. ज्याचा CGAR २५ टक्के दिसला आहे. यानंतर गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रात १७ टक्के आणि तंत्रज्ञान क्षेत्रात १४ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. १० कंपन्यांचे ब्रँड मूल्य ४.९ लाख कोटी रुपये आहे, जे यादीतील उर्वरित ४० ब्रँडच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त आहे, जे ३.३ लाख कोटी रुपये आहे, असंही इंटरब्रँडने सांगितले.
एफएमसीजी हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. यानंतर, गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रात 17 टक्के आणि तंत्रज्ञान क्षेत्रात 14 टक्के वार्षिक वाढ झाली आहे.असेही इंटरबँडच्या अहवालात म्हटले आहे.
SL/KA/SL
2 June 2023