४० दुचाकी झाल्या आगीत भस्मसात…

40 bikes burnt in fire…
कोल्हापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील इचलकरंजी इथं ‘ रॉयल ई’ या दुचाकी बाईकच्या गोडाऊनला अचानक आग लागून त्या आगीत 40 दुचाकी गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत.
या आगीत 40 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथल्या बालाजी चौक
मधील विक्रमनगर परिसरातील ‘रॉयल ई’ या बाईकच्या गोडाऊनला आज अचानक आग लागली. या आगीत 40 गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत.
ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्यानंतर आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं. यावेळी घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलच्या गाड्या तात्काळ दाखल झाल्यानं आग विझवण्यात यश आलं. अनिकेत लोले आणि मनप्रीत सिंग यांच्या ‘ रॉयल ई ‘ दुचाकी शोरूमला ही आग लागली.
ML/KA/SL
2 June 2023