उध्दव ठाकरे परदेशात , शरद पवार मुख्यमंत्री भेटीला
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर असताना इकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले , तिथे त्यांची बंद दारा आड चर्चा झाली. ही केवळ निमंत्रण देण्यासाठी झालेली सदिच्छा भेट होती असे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले.
आज सायंकाळी आपला ठरलेला कार्यक्रम अर्धवट सोडून मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी वर्षावर पोहोचले , शरद पवार याच वेळी तिथे पोहोचले , दोघांनी एकत्रित चर्चा केल्याचा छोटासा व्हिडिओ त्यांनी जारी देखील केला. त्यानंतर माध्यमांच्या कॅमेरा आणि प्रतिनिधींना वर्षा निवासस्थानी मुख्य दरवाजा समोर परवानगी देण्यात आली, अशी ती कधीही देण्यात येत नाही.
सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली, या दरम्यान शिवसेनेचे नेते देखील या ठिकाणी पोहोचले मात्र ते या भेटीत सामील नव्हते.यानंतर पवार माध्यमांशी न बोलता निघून गेले. मराठा मंदिर या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी पवार मुख्यमंत्री भेटीला गेले होते अशी माहिती मिळाली.मात्र केवळ एवढ्याच एका कारणासाठी स्वतः पवार मुख्यमंत्री भेटीला जातील आणि तिथे अन्य कोणतीही अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नसेल असे म्हणणे राजकीय परिपक्वतेला धरून होणार नाही हे निश्चित.
ML/KA/PGB
1 Jun 2023