राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरुध्द हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्षा पंचम ओमी कालानी यांनी २७ मे रोजी कॅंप ५ येथिल स्मैश टर्फ, प्रभात गार्डन या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांची समीक्षा बैठक व सार्वजनिक पक्ष प्रवेश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड , माजी खासदार आनंद परांजपे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते . तेव्हा आव्हाड यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात म्हटले की ” एक शेर को मारने के लिये १०० सिंधी कुत्ते भी कुछ नहीं कर सकते “असे जातीवाचक आणि अपमानजनक वक्त्यव्य केल्याने उल्हासनगर येथिल सिंधी समाजा भावना दुखावल्याने हा समाज आक्रमक झाला आहे . तेव्हा भाजपाचे शहर अध्यक्ष जमनादास पुरस्वानी यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जावुन जितेंद्र आव्हाड यांच्या विरुध्द विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . उल्हासनगर कॅंप ५ येथिल नेताजी चौका जवळ असलेल्या प्रभात गार्डन शेजारी स्मैश टर्फ या किक्रेट मैदानात २७ मे रोजी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा अध्यक्षा पंचम ओमी कलानी यांनी समिक्षा बैठक व पक्ष प्रवेश या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .तेव्हा या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री डॉ . जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते . सध्या शहरात राष्ठ्रवादीचे नेते भरत गंगोत्री व पप्पु कलानी यांचे शितयुध्द सुरु आहे . एकमेकावर टिका करण्याचे काम या दोन्ही गटा कडुन सुरु असुन याची टिणगी प्रथम ओमी कलानी यांच्या कडुन च पडली आहे . दरम्यान या बैठकीत डॉ जितेंद्र आव्हाड हे आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करताना गंगोत्री गटाला लक्ष करत म्हटले आहे की एक शेर को मारने के लिए १०० सिंधी कुत्ते भी कुछ नही कर सकते है . असे जातीवाचक आणि अपमान जनक वक्त्यव्य केले . या वक्त्यव्याने सिधी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने सिंधी समाज आक्रमक झाला आहे . जागो जागी जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाचे बॅनर लागले आहेत . शिवसेने ( शिंदे गट ) काल आव्हाड यांच्या विरुध्द मोर्चा काढुन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन आंदोलन केले , तर आज भाजपाचे शहर अधक्ष जमनादास पुरस्वानी यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जावुन जितेंद्र आव्हाड यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता १८६० च्या अधिनियमानुसार १५३ – ए . १५३ – बी , २९५ – ए आणि २९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .या बैठकीला राष्ट्रवादीचे मनोज लासी , कमलेश निकम , सुजित चक्रवर्ती , सोनु सिध्दीकी , बंटी चांदवानी , सीमा महेश आहुजा , राजेश टेकचंदानी संतोष पांडे , नरेंद्र ठाकुर हरेश जग्यासी हे उपस्थित होते . तर या गुंह्याचा तपास पोलिस निरीक्षक जगताप हे करत आहेत .
ML/KA/PGB 1 Jun 2023