माघारीचा प्रश्नच नाही, अनिल परब अडचणीत

 माघारीचा प्रश्नच नाही, अनिल परब अडचणीत

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) दापोली मुरुड मधील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम जेलमध्ये आहे आणि अनिल परब बेल वर आहे , आपण माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अनिल परब यांनी मागच्या 2 वर्षात 27 वेळा मला 100 कोटींची नोटीस दिलीये ,आता 24 महिने झाले. मी माफी मागायचे सोडा पण त्यांचा पार्टनर जेल मधे आहे असे सोमय्या म्हणाले.

सदानंद कदमने स्टेटमेंट दिलंय की, अनिल परब यांचा या घोटाळ्यात हात आहे.अनिल परबच्या मानसिक अवस्थेची मी कल्पना करू शकतो.
या रिसॉर्ट प्रकरणी 2021 मध्ये मी दाखल केलेली याचिका होती. मग परब आणि कदम हायकोर्टात गेले त्यामुळे या प्रकरणाची ग्रीन त्रिबूनल बेंच याची सुनावणी करू शकत नाही. असं हे प्रकरण आहे. मी याचिका मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही.

अनिल परबवर आधीच 10 केस सुरू आहेत. त्यांचं रिसॉर्ट सील झालं आहे, त्यांच्या CA ने स्टेटमेंट दिलंय.एकूण 18 लोकांनी स्टेटमेंट मध्ये असं म्हटलंय की त्यांचा हात आहे. 48 तासांपूर्वी अनिल परब यांनी पुन्हा मी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत नॅशनल ग्रीन त्रिबूनल यावर निर्णय देऊ शकत नाही. त्यामुळे आता यावर सुनावणी हाय कोर्टात होईल असेही सोमय्या यांनी सांगितले.

ML/KA/SL

30 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *