नागपूरात आजही पाऊस, अनेक झाडांची पडझड
नागपूर दि २९– हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज नागपूर शहरातील विविध भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. नवतपा सुरू असतांना आज नागपूर शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी चांगले ऊन पडले असतांना दुपारच्या सुमारास पावसाने नागपूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात पाऊस झाला.
गेल्या तीन दिवसांपासून नागपूर शहरात दररोज 4 नंतर पाऊस येत आहे. पाऊस झाल्यामुळे हवामानात गारवा निर्माण झालेला आहे. काल देखील नागपूर शहरातील काही भागात अवकाळी पाऊस झाला.