हत्तींचा पुन्हा धुमाकूळ, पिकांचे मोठे नुकसान…
कोल्हापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आजरा तालुक्यात हत्तींचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाला असून त्यांनी इथल्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान सुरू केलं आहे.
गेले अनेक दिवस हत्ती आजरा शहरानजीकच्या रामतीर्थ जंगल क्षेत्रात वावरत असून सायंकाळच्या वेळेला आजरा-साळगाव आणि आजरा-सोहळे मार्गावर वाहनधारकांना तो दर्शन देत आहे त्यामुळे नागरिकात घबराटीचं वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागानं हत्तीचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे. साळगाव गावांतील शेतात हत्तींनी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली.या हत्तींनी पहाटे चक्क साळगाव इथल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या संशोधन केंद्रातच धुडगूस घातला होता.
ML/KA/SL
29 May -2023