अजिंठा लेणी परिसरात आढळला मुक्तसंचार करणारा कोल्हा
छ संभाजीनगर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जग प्रसिद्ध अजिंठा लेणी परिसर हा जंगली परिसर असून या भागात विविध वन्य प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणात राहतात. सध्या उन्हाळा सुरू झाला असून जंगलात या वन्य प्राण्यांना अन्न पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने काही वन्य प्राणी अजिंठा लेणी परिसरात अन्न पाण्याच्या शोधत इकडे तिकडे फिरत असतात. आज सकाळी एक कोल्हा अन्न पाण्याच्या शोधात लेणी च्या पायथ्याशी असलेल्या बस स्थानक परिसरात दिसून आला आहे. यावेळी काही पर्यटकांनी कोल्ह्याला खाद्य पदार्थ खाण्यासाठी देवून जंगल सफरीचा आनंद घेतला आहे.
ML/KA/PGB 28 May 2023