ही आहेत नवीन संसद भवनाची वैशिष्ट्य

 ही आहेत नवीन  संसद भवनाची वैशिष्ट्य

नवी दिल्ली, दि. 27 मे (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे.

संसदेची नवीन इमारत त्रिकोणी डिझाइनची आहे. त्याच्या लोकसभेत ८८८ जागा आहेत आणि त्याच्या अभ्यागतांच्या गॅलरीत ३३६ पेक्षा जास्त लोक बसू शकतात. याशिवाय संसद भवनात राज्यसभेच्या ३८४ खुर्च्या आहेत. नवीन संसद भवन तांत्रिक सुविधांनी सुसज्ज आहे. नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सुमारे ८६२ कोटी रुपये खर्च आला आहे.

नवीन संसदेचा अंतर्भागातील छायाचित्रांती झलक

नवीन संसद इमारतीची वैशिष्ट्य

जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठ्या अशा या भव्य संसद भवनाची रचना एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. बिमल पटेल हे या भव्य वास्तूचे शिल्पकार आहेत.

ही ४ मजली वास्तू ६४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये विस्तारली असून तिला 3 दरवाजे आहेत, त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आली आहेत. खासदार आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेश असून ही इमारत भूकंप रोधक आहे.

संविधान सभागृह हे या नवीन इमारतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या सभागृहात संविधानाची प्रत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, देशाच्या पंतप्रधानांचे मोठे फोटोही लावण्यात आले आहेत.

SL/KA/SL

27 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *