रस्ते अपघातात चार ठार

 रस्ते अपघातात चार ठार

नंदुरबार, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील धडगाव ते तळोदा रस्त्यावर चांदसैली घाटात पिकअप वाहनाला अपघात होऊन चौघे ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातात अन्य तिघे जखमी असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

घरासाठी लागणारे कौल आणि पत्रे घेण्यासाठी पिकअपने (क्र. एमएच ४३ एडी १८१८) तळोदा येथे येत असताना चांदसैली घाटात हा अपघात घडला. तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप घाटातील दरीत कोसळून तुकाराम दिवल्या ठाकरे (३५), वीरसिंग रमेश पावरा, अमरसिंग शंकर ठाकरे (३५) व मुकेश तेजला ठाकरे (२२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर स्वरूपसिंग ठाकरे, गणेश ठाकरे, वसंत साकऱ्या ठाकरे हे गंभीर जखमी झाले आहेत.Four killed in road accident

ML/KA/PGB
24 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *