कोळसा खाणीत स्फोट,11 कामगार जखमी,6 गंभीर

नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील सावनेर तालुक्यातील वेकोलिच्या सिल्लेवाडा कोळसा खाणीच्या सीम-२ मधील सेक्शन-६ मध्ये काल सायंकाळी स्फोट झाल्याने ११ कामगार जखमी झाले आहेत. यातील सहा कामगारांना नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
हे सर्व कामगार कंत्राटी आहेत. काल सायंकाळी नेहमीप्रमाणे सिल्लेवाडा कोळसा खाणीतील सीम-२ च्या सेक्शन-६ मध्ये कोळसा काढण्याचे काम करीत होते. त्यातच एअर स्टोनिंग ब्लास्ट झाल्याने आग लागली. त्यात ११ कामगार जखमी झाले. या कामगारांच्या शरीरावर भाजल्यामुळे जखमा झाल्या आहेत. 11 जखमी कामगारांपैकी 6 जण गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.Explosion in coal mine, 11 workers injured, 6 seriously
ML/KA/PGB
24 May 2023