कंटेनर आणि बसचा भीषण अपघात 6 ठार , 23 जण जखमी…

 कंटेनर आणि बसचा भीषण अपघात 6 ठार , 23 जण जखमी…

बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुन्या नागपूर मुंबई महामार्गावरील बुलडाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन सहा जण ठार तर 23 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. अपघात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला.

बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर मुंबई महामार्गावरील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे
कंटेनर व एसटी बस मध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार व 23 जखमी झालेल्यांची माहिती प्राप्त झाली आहे.

घटनेनंतर मृतक तसेच जखमी झालेल्यांना सिंदखेडराजा आणि जालना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत मृतांची एकूण संख्या ६ असून, त्यामध्ये बस व कंटेनरचे चालक व ४ प्रवाश्यांचा समावेश आहे.

गंभीर जखमी झालेल्या २३ जणांना जालना येथे हलविण्यात आले आहे. त्यामध्ये तीन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसचे वाहक गंभीर जखमी व त्यांना जालना येथे हलविण्यात आले असल्यामुळे निश्चित प्रवासी संख्या कळू शकली नाही.

ML/KA/SL

23 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *