गरीब रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय तसेच खाजगी रुग्णालयांना चाप लावा

 गरीब रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय तसेच खाजगी रुग्णालयांना चाप लावा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धर्मदाय आणि खाजगी रुग्णालयात गरीब रुग्णांची होणारी लूट थांबविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री तानाजी सावंत,वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ कठोर करावी आणि रुग्णालयाच्या मनमानीपणे चालणाऱ्या व्यवस्थापनाच्या कारभाराला चाप लावावा अशी मागणी रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात केली.
यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस संजय जोशी, उपाध्यक्ष शशिकांत लिंबारे,सुरेश कुमार, अर्पणा साठे, सुनीता डोळस ,विणा सोनार आदी सहकारी उपस्थित होते.

 महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पुणे आणि मुंबईतील धर्मदाय रुग्णालयांच्या मनमानी कारभाराविरोधात
आमदार राम सातपुते,आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते.आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 20 मार्च 2023 रोजी रुग्णालयां विरोधात आवाज उठविणाऱ्या आमदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीत गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याबाबत धर्मदाय रुग्णालयांनी टाळाटाळ केल्यास,गरीब रुग्णांची पैशाअभावी अडवणूक केल्यास हा प्रकार म्हणजे विधिमंडळाचा अपमान समजण्यात येईल.त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले होते.गरीब रुग्णांनी त्यांच्या मदतीसाठी असलेली कागदपत्रे दाखविल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ मोफत उपचार सुरू करण्यात यावे अन्यथा रुग्णांवर उपचार न करणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांच्या विरोधात विधिमंडळाची हक्कभंग कारवाई करण्यात येईल असा धाडसी निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला होता.मात्र या निर्णयाला रुग्णालयव्यवस्थापनांनी केराची टोपली दाखविली आहे.असा गंभीर आरोप उमेश चव्हाण यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आदेशाला आणि कारवाईच्या निर्णयाला धर्मदाय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालये जुमानित नसल्याचे सांगत याबाबत कठोरात कठोर कारवाई करून रुग्णालयांच्या व्यवस्थापनाला धड़ा शिकवावा अशी मागणी शशिकांत लिंबारे यांनी केली.
अशा रुग्णालय प्रशासना विरोधात रुग्ण हक्क परिषदेच्या मार्फत जनजागृती तसेच आंदोलनाची हाक देण्यात येईल असा इशारा यावेळी उमेश चव्हाण यांनी दिला.रुग्णहक्क परिषदेच्या मुंबई आणि राज्यस्तरीय कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही याप्रसंगी करण्यात आली. गरीब रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय तसेच खाजगी रुग्णालयांना चाप लावाBlame the charitable and private hospitals that prey on poor patients

ML/KA/PGB
20 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *