ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार

 ट्रॅक्टर आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात 5 जण ठार

सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.मृतांमध्ये 3 महिला,1 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे,हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते.मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपुर माहमार्गावरील वडडी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहचली असता ,रॉग साईडने विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला,ज्यामध्ये भरधाव असणारी बलोरे गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली,ज्यामध्ये गाडीचा चक्काचुर होऊन 5 जण जागीच ठार झाले आहेत,तर 3 जण गंभीर जखमी झाली आहे.

जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.हे सर्व जण देवदर्शनासाठी कोल्हापूरहुन पंढरपूरला निघाले होते,एकाच कुटुंबातील हे सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील सरवडे येथील रहिवाशी आहेत.5 killed in a tragic accident involving a tractor and a bolero

ML/KA/PGB
17 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *