मुंबईत नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये २३७ टक्क्यांनी वाढ
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या नऊ वर्षात मुंबई शहरात नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये २३७ तर घन कचरा व्यवस्थापनाच्या तक्रारीमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे, असे प्रजा फाउंडेशनने आज प्रेस क्लब मध्ये ‘मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती २०२३ हा अहवाल प्रसिद्ध करताना म्हटलं आहे.
मुंब महानगरपालिका ही मार्च २०२२ मध्ये स्वच्छ भारत अभियानातील “कचरा मुक्त शहर ‘ या योजने अंतर्गत पंचतारांकित मूल्यांकन प्राप्त करण्यात अपयशी ठरली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला घन कचरा व्यवस्थापनेच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेद्वारे कचरा वाहतूक आणि क्षेपणभूमी व्यवस्थापनाचा खर्च कमी करून अंदाजे १४८५ कोटी एवढी बचत करता आला असता असे या अहवालात नमूद केले आहे.
केंद्र शासनाचे घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ हे क्षेपणभूमी मध्ये पाठविण्यात येणारा कचरा कमी करण्याची काही करणे नमूद केली आहे .यात सन २०२० मध्ये क्षेपणभूमी मध्ये प्रति दिन ६९०४ मेट्रिक टन एवढा कचरा वाहतूक करण्यात आला तर २०२२ मध्ये प्रति दिन ७५८२ मैट्रिक टन कचरा वाहतूक करण्यात आला.येथे १० टक्यांनी वाढ झालेली आहे.
सन २०२२ मध्ये अधिकतम दरडोई प्रती दिन कचरा ए, बी आणि एव पश्चिम विभागातून अनुक्रमे २.९० कि.ग्रा., ०.८४ कि.ग्रा. ०.७६ कि.ग्रा., जमा करण्यात आला.
सन २०२२ मध्ये अधिकतम कचरा निर्माण करणाऱ्या २८२५ गृहनिर्माण स्थापैकी ५०% (१४०१) संस्थांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कच-याची विल्हेवाट लावली नाही. मिठी नदी मध्ये विष्ठेद्वारे जीवाणूमुळे होणारे प्रदूषण अतिशय जास्त आहे (१७००० एम पी एन /१०० एम एल) जे सीपीसीबीच्या कमीत कमी निर्धारित २५०० एम पी एन/ १०० एम एल प्रमाणापेक्षा अधिक आहे.
मुंबई शहराला वायु प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्रोत अशा गंभीर समस्या जलद गतीने होणाऱ्या हवामान बदलामुळे व अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमुळे भेडसावत आहेत. सन २०१८ ते २०२२ या मागील ५ वर्षामध्ये अधिकतम सरासरी वार्षिक हवा गुणवत्ता निर्देशांक २०२२ (वार्षिक सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक – १३५) मध्ये नोंदविण्यात आला.
यावेळी प्रज्ञा फाउंडेशन संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले की, ” २०२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये (एमसीएपी) घन कचरा व्यवस्थापनेची कार्यक्षमता सुधारणे, मलनिःसारण प्रकिया आणि हवेची उत्तम गुणवत्ता अशा ठोस उपाययोजनांचा समावेश केला आहे जे एक सकारात्मक पाऊल आहे”.237 percent increase in citizens’ pollution complaints in Mumbai
ML/KA/PGB
16 May 2023