महेश आहेर प्रकरण राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना केले तडीपार

ठाणे,दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि कळवा-मुंब्राचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कौटुंबिक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे पालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण केली होती. त्या राष्ट्रवादीच्या अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर १५ फेब्रुवारी रोजी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मारहाण करणारे अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांना ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
सदर प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नौपाडा पोलिसांनी चारही आरोपींच्या तडीपारीची कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, या चौघांना ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवीमुंबई, रायगड जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपारीची कारवाई करण्यात आली. चारही जणांना ठाणे जिल्ह्याबाहेर सोडण्यात आल्याचे पोलीसानी सांगितले.
SL/KA/SL
16 May 2023