ICC कडून फलंदाजांना हेल्मेट बंधनकारक

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आता विशिष्ट परिस्थितीत हेल्मेट अनिवार्य केले आहे. आपण फक्त विकेट किपर्सनीच हेल्मेट घातलेले पाहतो. पण आता हेल्मेटची सक्ती जेव्हा फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागतो, जेव्हा यष्टीरक्षक स्टंपपर्यंत उभे असतात आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ असतात तेव्हा करण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार, आयसीसीने ‘हाय-रिस्क पोझिशन’साठी हेल्मेट सक्तीचे केले आहे. फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करताना, यष्टीरक्षकाला स्टंपपर्यंत उभे असताना आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ उभे राहिल्यास हेल्मेटची सक्ती केली आहे.

“आम्ही खेळाडूंच्या सुरक्षेवरही चर्चा केली, जी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. समितीने निर्णय घेतला की खेळाडूंच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी हेल्मेट वापरणे काही विशिष्ट स्थानांवर अनिवार्य करणे चांगले आहे”, सौरव गांगुलीने म्हटले आहे.

SL/KA/SL

15 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *