हवाई दलातील हे वरिष्ठ अधिकारीही सापडले पाकीस्तानच्या हनिट्रॅपमध्ये

 हवाई दलातील हे वरिष्ठ अधिकारीही सापडले पाकीस्तानच्या हनिट्रॅपमध्ये

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी विशेष न्यायालयात दिली.

कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनीट्रॅप) अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. शेंडे सध्या बंगळुरू येथे नियुक्तीस आहेत. त्यांची हवाई दलातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडूनही (एटीएस) त्यांची चौकशी करण्यात आली असून त्यांचा शिवाजीनगर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदविण्यात आला आहे, असे एटीएसच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विशेष न्यायालयात सांगितले.

दरम्यान तांत्रिक तपासासाठी कुरुलकरांच्या एटीएस कोठडीत एक दिवस वाढ करण्याची विनंती एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी कुरुलकर यांना मंगळवारपर्यंत (१६ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

SL/KA/SL

15 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *