गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहा जण जखमी

 गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहा जण जखमी

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील खार (पश्चिम)खारदांडा कोळीवाडा परिसरात सकाळी पावणे नऊच्या सुमारास गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहा जण भाजले असून त्यांच्यावर वांद्रेच्या भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.मुंबईतील खार उपनगरात खारदांडा येथील गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरी आहे. या बेकरीत गॅस गळती झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले.या आगीत सखुबाई जैयस्वाल (६५), प्रियांका जैयस्वाल (२६), निकिता मंडलिक (२६), सुनील जैयस्वाल (२९), यश चव्हाण (७) आणि प्रथम जैयस्वाल (६) जखमी झाले असून त्यांना आगीतून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली आहे, तर कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीमुळे जखमी झालेल्या ६ जणांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सर्वजण ४० ते ५१ टक्के भाजले आहेत. जखमींमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

ML/KA/PGB 15 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *