CBI च्या संचालकपदी प्रवीण सूद यांची नियुक्ती

 CBI च्या संचालकपदी प्रवीण सूद यांची नियुक्ती

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदी प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. सूद यांची ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असणार आहेत. हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. CBI चे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे.

CBI संचालक या पदाच्या नियुक्तीसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश होता.

प्रवीण सूद हे कर्नाटकचे १९८६ बॅचचे अधिकारी आहेत. सूद हे हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील आहेत. ते आयआयटी दिल्लीचे पदवीधर असून त्यांनी आयआयएम बंगळुरूमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. वयाच्या 22 व्या वर्षी ते पोलिस सेवेत रुजू झाले. ते बेल्लारी व रायचूरचे एसपी होते. याशिवाय त्यांनी बंगळुरू व म्हैसूरचे डीसीपी म्हणूनही काम केले आहे.

सूद यांना 1996 मध्ये मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णपदक मिळाले. याशिवाय 2002 मध्ये पोलिस पदक व 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पोलिस पदक मिळाले. जून 2020 मध्ये प्रवीण सूद यांची कर्नाटकच्या डीजीपीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

SL/KA/SL
14 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *