सीमेवर पार पडला पहिला पालखी भेट सोहळा…
सांगली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोळ्यांचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोंत्याव बोबलाद येथे पार पडला आहे.रोमहर्षक असा हा देवांच्या भेटीचा पालखी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातले हजारो भाविक उपस्थित होते.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोंत्याव बोबलाद गावाच्या ग्रामदैवत कुंती देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.तीन दिवस चालणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य देवाच्या भेटींच्या पालखी सोहळा पार पडला आहे.दरवर्षी पार पडणाऱ्या कुंती देवी यात्रे निमित्ताने देवीला तिच्या नात्यातल्या देवांच्या भेटीचा पालखी सोहळा पार पडतो.यंदा हा भेटीच्या पालख्याचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे.
ज्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून कुंती देवीच्या भेटीला सुमारे 25 देवांच्या पालख्यांनी सहभाग घेतला होता.गावाच्या बाहेर असणाऱ्या पटांगणामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करत देवांच्या पालखी भेटीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पडला.
नयनरम्य भेटीच्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून सुमारे 15 हजारहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली होती. जागृत देवस्थान म्हणून कुंती देवीची ओळख असून तीन दिवस पार पडणाऱ्या या यात्रेमध्ये भाविकांच्यासाठी मोफत प्रसादाचाही आयोजन करण्यात येतं.या पालखी सोहळ्या दरम्यान त्राटीका सोंग नृत्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
ML/KA/SL
14 May 2023