अकोल्यात दोन तुफान दगडफेक, दंगल. गाड्यांची जाळपोळ
अकोला, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला शहरात काल रात्री दोन गटात तुफान दगडफेक होऊन काही ठिकाणी जाळफोळ झाल्याने चार ते पाच दुचाकी व चार चाकी जाळण्यात आल्या तसेच या दंगलीमध्ये दोन व्यक्तींना जबर दगड विटांनी मारहाण झाली. तसेच एक पोलीस जखमी झाला आहे.
पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवले असून या जमावाला पांघवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धूर वापर केला. या घटनेत राजेश्वर मंदिर चौकातील किराणा दुकानातील काही ठिकाणी आग सुद्धा लावण्यात आली होती ती सुद्धा अग्निशामक विभागाच्या वतीने विझवण्यात आले आहे. शहरात स्थिती गंभीर असल्याचे पाहता निमा अरोरा जिल्हाधिकारी अकोला यांनी शहरात 144 जमाबंदी सह संचारबंदी कायदा लागू करण्यात आली आहे.
नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अकोला अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले आहे.
ML/KA/SL
14 April 2023