न्यायालयाचा निकाल गोंधळात टाकणारा
ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेला राज्यातील सत्तासंघर्ष निकाल खूपच गोंधळात टाकणारा आहे, त्यामुळे मोठा धुरळा उडाला आहे , तो खाली बसला की नेमके काय झाले ते समजेल अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. आजपासून त्यांनी ठाणे , पालघर दौऱ्याला सुरूवात केली तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.सगळे चुकले मात्र तरीही मुख्यमंत्री पद कायम राहिले आहे, हे स्पष्ट होत नाही, अनेकवेळा कोर्टाची आणि कायदेशीर भाषा समजतच नाही, कधीतरी आलेल्या नोटीसा वाचल्यावर त्या सोडण्यासाठी आहेत की अटक करण्यासाठी असा प्रश्न पडतो असेही ते म्हणाले.तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणून त्यांना परत आणता येत नाही असे कोर्ट म्हणते म्हणूनच आताच्या मुख्यमंत्र्यानी काळजी घ्यावी आणि सांभाळून राहावे , आपण ज्या पदावर बसलो आहोत त्यापदासाठी ते आवश्यक आहे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
ML/KA/PGB 12 May 2023