नैतिकता ठेऊन राजीनामा द्या , जनतेच्या खऱ्या न्यायालयात जाऊया

 नैतिकता ठेऊन राजीनामा द्या , जनतेच्या खऱ्या न्यायालयात जाऊया

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेला बटीक बनवण्याचा झालेला प्रयत्न काल सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे , शिंदे सरकारचे जीवदान तात्पुरते, महाराष्ट्राची अवहेलना थांबवा , एव्हढी बदनामी , धिंडवडे निघाल्यावर नैतिकता राखून राजीनामा द्या आणि जनतेच्या खऱ्या न्यायालयात सामोरे जाऊया , पंतप्रधान मोदींनी देखील याकडे लक्ष द्यावे , आपण या लोकशाही बदनाम करणाऱ्या लोकांना चाप  लावावा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.

राज्यात बेबंदशाही माजवण्याच्या प्रयत्नाला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला, भाजपाचा हिंदुत्वाच्या नावाखाली असलेला बीभत्स चेहरा उघड झाला असे ठाकरे म्हणाले.  विधानसभेच्या विद्यमान अध्यक्षांना राजकीय प्रवास कसा करायचा हे चांगलं कळतं, त्यांना तीन पक्षांचा अनुभव आहे असा टोला ही त्यांनी लगावला.

घटनाबाह्य कृती करणाऱ्या राज्यपालांवरही कारवाई झाली पाहिजे. माझ्यातील नैतिकतेला जागून  मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे मी त्यावर समाधानी आहे. अध्यक्षांनी योग्य निर्णय घ्यावा , सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत राहून तो घ्यावा अन्यथा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

सदस्यता अपात्रता ठरण्यासाठी महत्वाचा असणारा प्रतोद हा सुनील प्रभू आहे ,  भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केली आहे, गटनेते पदी अजय चौधरी यांची नियुक्ती देखील वैध ठरवली आहे. याबाबतचा 2019 चा ठराव कोर्टाने मान्य केला आहे . त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

आज आम्ही अध्यक्षांना पत्र देऊन लवकरच त्यावर निर्णय द्यावा, अशी मागणी करीत आहोत,  यासाठीचे सर्व पुरावे विधिमंडळात उपलब्ध आहेत, त्यामुळे सुनावणी साठी वेळ लागू नये अशी आमची मागणी आहे.
परिशिष्ट दहा मध्ये नमूद केलेल्या तरतूदी नुसार हे आमदार अपात्र ठरतात , पक्ष चिन्ह आणि नाव याबाबतची याचिका देखील पुढील आठवड्यात सुनावणी ला येईल , त्यात आम्हाला न्याय मिळेल, ज्यावेळी पक्षादेश जारी झाला त्यावेळी मूळ पक्ष कोण आणि प्रतोद कोण हे विचारात घ्यावे लागेल, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे, हे अध्यक्ष कसे बेकायदेशीर आहेत त्याचीही दाद मागितली जाईल असेही परब म्हणाले.Resign with morality, let’s go to the real court of the people

ML/KA/PGB
12 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *