सीमाभागातील मराठी भाषिकांचे भवितव्य आजच्या मतदानावर

 सीमाभागातील मराठी भाषिकांचे भवितव्य आजच्या मतदानावर

बेळगाव, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगाव आणि विजापूरसह बिदर, भालकी या मराठी बहुभाषक भागात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान शांततेत मतदान झाले. या भागात चुरशीच्या लढती होत असल्यानं महाराष्ट्रातही उत्सुकता वाढली आहे.

यंदा या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभागातील सहा मतदार संघात बारा मराठी उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची अजंली निंबाळकर, माजी मंत्री मदन पाटील यांचे मावस भाऊ श्रीमंत पाटील, काकासाहेब पाटील, मुरलीधर पाटील, आर. एम. चौगुले, अविनाश जाधव अशा अनेकांचा समावेश आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची झालेली हवा आणि एकीकरण समितीनं मनापासून केलेला प्रचार यामुळे या भागात प्रचंड चुरस निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेसाठी आज सकाळपासून मतदान झाले . यंदा या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती सहा मतदार संघात एकदिलानं उतरली आहे.

तीन मतदार संघात हवा झाल्यानं इथं महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
काहींही करून मराठी बांधवांचा आवाज विधानसभेत पोहोचविण्याचा निर्धार बेळगावच्या तीन मतदार संघात केला आहे. इतर ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत होत आहे.

सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज कर्नाटक विधानसभेत पोहोचविण्यासाठी एकत्र आलेल्या एकीकरण समितीच्या नेत्यांबरोबरच माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांची सीमाभागात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेल्या लक्ष्मण सवदी यांच्याकडे संपूर्ण कर्नाटक आणि सीमाभागाचं लक्ष आहे.

निवडून येईपर्यंत ना हार, ना फेटा अशी घोषणा त्यांनी केली आहे. भाजपला धडा शिकवतानाच काँग्रेसला ताकद देण्यासाठी त्यांनी सीमाभागात जोरात प्रचार केला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची ताकद दिसणार आहे. एकेकाळी काँग्रेसची ताकद असलेले जारकीहोळी बंधूंची ताकद आता दोन पक्षात विभागली गेली आहे.

रमेश भाजपतर्फे तर सतीश काँग्रसचा झेंडा हाती घेऊन मैदानात उतरले आहेत.
तिकीट वाटपात हस्तक्षेप केल्यानं रमेश जारकीहोळी यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचे त्यांच्या निकालापेक्षा ते इतर किती जागा भाजपला मिळवून देतात याकडे लागलं आहे.

कर्नाटकच्या मंत्री शशीकला जोल्ले यांच्या निपाणी मतदार संघाकडे नजरा लागल्या आहेत. पती खासदार आण्णासाहेब जोल्ले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सीमाभागात उमेश कत्ती बंधुचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सीमाभागातही जातनिहाय मतदान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लिंगायत, वक्कलिंगायत, धनगर यांच्या मताकडे लक्ष लागले आहे.

ML/KA/PGB 10 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *